Bharat Jain Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai: गोष्ट मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची! करोडोंची संपत्ती पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

Mumbai: मुंबई हे शहर स्वप्नांची नगरी म्हणून ओळखले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या देशात आपली स्वप्ने घेऊन येतात.

Manish Jadhav

Mumbai: मुंबई हे शहर स्वप्नांची नगरी म्हणून ओळखले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात आपली स्वप्ने घेऊन येतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात, तर काहींना खूप संघर्ष केल्यानंतर यश मिळते.

दरम्यान हे शहर करोडपतींपासून-भिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सामावून घेते. आज आम्ही तुम्हाला अशा एका भिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याच्याबद्दल जाणून तुम्हीही चकीत व्हाल. खरंच, मुंबईत जगण्यासाठी करोडो लोक रोज संघर्ष करतात. पण या भिकाऱ्याच्या संपत्तीबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया या भिकाऱ्याविषयी...

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, भरत जैन हे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी असून ते मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसतात. आर्थिक अडचणींमुळे जैन यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. ते विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि वडील असा परिवार आहे. जैन यांनी 7.5 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. भीक मागून त्यांची मासिक कमाई 60,000 ते 75,000 रुपयांच्या दरम्यान आहे.

दरम्यान, भरत जैन यांच्याकडे मुंबईत 1.2 कोटी किमतीचा 2 BHK फ्लॅट आहे. तर ठाण्यात 30,000 दरमहा भाड्याने दोन दुकाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन (CSMT) किंवा आझाद मैदान यांसारख्या प्रमुख ठिकाणी जैन भीक मागतात.

एवढे श्रीमंत असूनही जैन आजही मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर भीक मागताना दिसतात. बरेच तास काम करुनही काहीशे रुपये मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असताना, जैन लोकांच्या उदारतेमुळे 10 ते 12 तासांत दिवसाला 2,000-2,500 रुपये कमावतात.

तसेच, जैन आणि त्यांचे कुटुंब परळमधील 1BHK डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांच्या मुलांनी कॉन्व्हेंट शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात. ते जैन यांना भीक मागणे बंद करण्याचा सल्ला देतात, तरीही ते त्यांचे ऐकत नाहीत. जैन यांचे निरंतरपणे भीक मागणे सुरुचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT