Mumbai-Goa highway crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर सुटकेसमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह; टॅटूमुळे मिळणार क्ल्यू?

Mumbai Goa Highway Crime News: सुटकेस उघडून पाहिली असता त्यात ३५ ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला.

Pramod Yadav

रायगड: मुंबई - गोवा महामार्गालगत एका सुटकेसमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथील नदी किनारी एका सुटकेसमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून उग्र वास येत असल्याने स्थानिकांनी शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुरशेत फाटा येथील बाळगंगा नदीकिनारी स्थानिकांना एक मोठी सुटकेस आढळून आली. याच सुटकेसमधून उग्र वास येत असल्याने गावचे सरपंच दशरत गावंड यांनी संबधित घटनेची माहिती गावच्या पोलिस पाटलांना दिली. पोलिस पाटलांनी पेण पोलिसांनी माहिती देताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुटकेस उघडून पाहिली असता त्यात ३५ ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला.

पेण पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. महिलेची ओळख अद्याप पटली नसून, तिच्या हातावर मात्र एक टॅटू आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांत महिलेचा खून करुन मृतदेह सुटकेसमध्ये बंद करुन याठिकाणी फेकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत", असे बागूल म्हणाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षापूर्वी शिना बोराची देखील हत्या करुन तिचा मृतदेह पेणच्या जंगलात जाळण्यात आला होता. याशिवाय मुंबईतील दोन व्यावसायिकांची हत्या करुन मृतदेह रायगड मधील मुंबई - गोवा महामार्गालगत फेकण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मृतदेह परिसरात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी सक्त कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT