Will Anil Deshmukh get clean chit from CBI? Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांना CBIची क्लीन चिट मिळणार?

मुंबईतील कुठल्याही आँर्केस्ट्रा, बार, पब याच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मागितल्याबाबतचे पुरावेही समोर आले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. (Anil Deshmukh)

दैनिक गोमन्तक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर जो बदल्यांसंदर्भात गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता त्याच संदर्भात आता सीबीआयकडून (CBI) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या या अवाहलानुसार देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे समोर आले आहे. या अहवालात अनिल देशमुखांविरोधात सीबीआयच्या चौकशीत ठोस पुरावे मिळून आले नसल्याचे समोर आले आहे.आणि यानुसारच अनिल देशमुख यांना क्लीनचिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Will Anil Deshmukh get clean chit from CBI?)

CBIने आपल्या अवाहलात नेमके काय सांगितले आहे

  • मुंबईतल्या पोलीस उपायुक्त पदापर्यंतच्या बदल्या या पोलीस आयुक्तालयातून ठरवल्या जात असून IPS अधिकार्याच्या बदल्या आणि नियुक्त्या या पोलीस आस्थापना मंडळाकडून गृहसचिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवल्या जात असतात.

  • पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत निलंबित अधिकारी असल्यास या अधिकाऱ्यांना पून्हा पोलीस खात्यात घेण्याचे अधिकार देखील पोलीस आस्थापन मंडळालाच असतात. तर ग्रामीण भागातील निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतचे अधिकार हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक व गृहसचिव यांना असतात. मुंबई शहरामध्ये पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकार्याचे पूनस्थापनेबाबत निर्णय घेण्याचे सर्वे अधिकार हे पोलीस आयुक्तांना आहेत.

  • सचिन वाजे या अधिकारीला पून्हा सेवेत घेण्याबाबतचा निर्णय हा पोलीस आस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता . सचिन वाजेच्या पूनस्थापनेनंतर दोनच दिवसात सीआययू चा इनचार्ज म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती . ही पोस्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याची असताना. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पून्हा नियुक्ती झालेल्या सचिन वाजेला देण्यात आली.

  • सचिन वाझेची नियुक्ती केल्यानंतर तो कुठलाही प्रोटोकाँल पाळत नव्हता.कुठलीही माहिती देताना तो त्यांच्या वरिष्ठांना डावलून थेट पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करत असे . अँन्टिलिया स्फोटक प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आले होते की, मुंबईतील अनेक मोठे आणि संवेदनशील गुन्हे हे पोलिस आयुक्त परमबीर सिंह याच्या आदेशानुसार सचिन वाझेला तपासासाठी दिले जात आहेत . तसेच या संवेदनशील गुन्ह्यांची माहिती तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जायचे. त्यावेळी ते सोबत सचिन वाझेलाही घेऊन जात होते. यावर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता.

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांच्यात ज्ञानेश्वरी या बंगल्यावर गुन्ह्याच्या माहिती देण्यासाठी इतर अधिकार्यांसोबत बैठक होत . या व्यतिरिक्त इतर कुठलिही बैठक झाली असल्याबाबतचे पुरावे नाहीत असेही सीबाईने स्पष्ट केले आहे.

  • त्याचबरोबर वर्षा बंगल्यावरही गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांच्यात केवळ दोनदाच भेट झाली होती एक म्हणजे अर्णब गोस्वामी प्रकरणावेळी तर दुसरी अँन्टिलिया स्फोटक प्रकरणी

  • तसेच मुंबईतील कुठल्याही आँर्केस्ट्रा, बार, पब याच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मागितल्याबाबतचे पुरावेही समोर आले नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

  • त्याचबरोबर सचिन वाझे केव्हाही एकट्यात अनिल देशमुख यांना भेटलाच नाही

  • सचिन वाझे ज्या वेळी देशमुखांना भेटायला आला त्या वेळी पोलिस आयुक्त परमबीर सि़ह सोबत असायचे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT