Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

Sindhudurg Crime News: कुडाळ – घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ०२ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. कॉलेजला जाते असे सांगून घरातून ती बाहेर पडली होती.

Pramod Yadav

सिंधुदुर्ग: कुडाळ- घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुलगी दोन महिन्यांपूर्वी कॉलेजला जातेय असे सांगून घरातून बाहेर पडली होती मात्र ती माघारी न आल्याने घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

१७ वर्षीय मुलीचा खून केल्याचे कृणाल कृष्णा कुंभार (२२, रा. गोठोस, मांडशेतवाडी, कुडाळ) येथील  तरुणाला अटक करण्यात आली होती. चौकशीअंती तरुणाने मुलीचा खून केल्याचे कबुल केले होते. तसेच, त्याने मुलीचा मृतदेह कोठे लपवून ठेवलाय याची देखील माहिती पोलसांना दिली होती. पोलिसांसोबत जाऊन मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

संशयित तरुणाने मुलीचा खून केल्यानंतर एका बॅगमध्ये नायलॉनची दोरी, मोबाईल, शालेय वस्तू, कात्री, सॅनिटरी पॅड, ओळखपत्र यासह विविध १६ वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तरुणाने एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून केल्याचे आता तपासातून समोर आले आहे. तरुणाने पोलिस तपासात खूनाबाबत कबुली दिली आहे.

कुडाळ – घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ०२ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. कॉलेजला जाते असे सांगून घरातून ती बाहेर पडली होती. मुलगी घरी माघारी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार ०३ ऑगस्ट रोजी कुडाळ पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपासचक्रे गतीमान केली होती.

याप्रकरणी मुलीच्या मित्रपरिवाराची देखील चौकशी सुरु करण्यात आली. यात संशयित कृणालवर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीअंती अखेर त्यांनी खूनाची कबुली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT