Gold Smuggling at mumbai Airport: सोने, दागिने किंवा ड्रग्स लपवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. अनेकदा असे अनेक जण विमानतळावरही पकडले जातात. अशीच एक घटना तीन नागरिकांना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. या लोकांकडून 1.4 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
हे परदेशी नागरिक आदिस अबाबाहून मुंबईत आले होते. या लोकांनी अंडरवेअर आणि बुटांच्या तळव्यामध्ये सोने लपवले होते. एकूण सोने 3 किलोपेक्षा जास्त होते आणि त्याची किंमत अंदाजे 1.40 कोटी रुपये आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लोकांना तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. अशाप्रकारे सोने लपवण्याचे कारण काय, याची माहिती या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये लोक त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये द्रव स्वरूपात सोने लपवतात. पण सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांपासून ते सुटत नाहीत आणि अनेकदा विमानतळावरच पकडले जातात. अशा प्रकारे सोने आणण्याचा उद्देश इतर मार्गांनी आयात शुल्क आणि कर टाळणे हा आहे. अलीकडेच, देशातील विविध विमानतळांवर सीमाशुल्क विभागाने अनेकांना अमली पदार्थ आणि सोन्या-चांदीच्या वस्तूंसह अटक केली आहे ज्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.