Chitra Wagh Dainik Gomantak
महाराष्ट्र

पीडितेला इंजेक्शन देऊन नेलं गोव्यात; कुचिक प्रकरणाची चित्रा वाघांनी दिली माहिती

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरूणीची कहाणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांना ऐकवली होती.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे (shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरूणीची कहाणी भाजपच्या (BJP) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकारांना ऐकवली होती. रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 376 आणि 313 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. मागील महिन्यात हे प्रकरण घडले होते. जे आता पुन्हा समोर येत आहे.

24 वर्षीय महिलेने नेत्यावर लग्नाचे खोटे आश्वासन आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला होता. दरम्यान पुण्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी गायब झाल्याचा आरोप करत भाजपने एकच खळबळ उडवून दिली. याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आरोप करणारी महिला 2 दिवसांपासून गायब होती. ती आज गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात सापडली आहे.

दरम्यान काल रात्री त्या पिडीत मुलीचा फोन आल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. इंजेक्शन देऊन काही व्यक्तींनी अपहरण केले ज्यामध्ये पोलिसांचाही सहभाग असल्याची माहिती पिडीतेने दिली. पीडितेला महाराष्ट्रातून गोव्यात नेल्याची धक्कादायक माहिती दिल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. या संदर्भात अधीक माहिती पुणे पोलिसांना देणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT