गुगलवर तुम्ही ज्या गोष्टी सर्च करता त्याचा ट्रॅक ठेवला जात असतो. तसेच, अनेक देशी, विदेशी यंत्रणा याकडे बारकाईने लक्ष ठेवत असतात. अशीच एक घटना मुंबईमधून समोर आली आहे. ज्यामुळे एका इंजिनिअर युवकाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. तेही थेट अमेरिकेच्या मदतीमुळे. काय आहे नक्की प्रकरण जाणून घेऊया.
(US intel, CBI, Mumbai police foil techie's suicide plan)
यूएस नॅशनल सेंट्रल ब्युरो (NCBs), CBI आणि मुंबई पोलिसांनी बुधवारी एका 25 वर्षीय इंजिनिअर युवकाच्या आत्महत्या करण्याचा प्लॅन उधळून लावला. या युवकाने गुगलवर 'वेदनारहित आत्महत्या कशी करावी' असे सर्च केले होते. गुगलवर नजर ठेवणाऱ्या यूएस इंटेल एजन्सीला याबाबत माहिती मिळाली.
यूएस इंटेल एजन्सीने सीबीआयला तात्काळ अलर्ट केले. दरम्यान, सीबीआयने मुंबई पोलिसांना सोबत घेऊन शहर गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या मदतीने कुर्ल्यातील युवकाचे कार्यालय शोधून काढले व युवकाला आत्महत्येपासून वाचविले. कर्ज म्हणून घेतलेले तीन लाख रूपये परत करू न शकल्याने त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. असे त्या युवकाने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, या युवकाने गुगलवर 'वेदनारहित आत्महत्या कशी करावी' असे सर्च केले. याची यूएस नॅशनल सेंट्रल ब्युरोला माहिती मिळाली. मुंबईत एक युवक आत्महत्या करणार असल्याची माहिती NCBने मुंबई पोलिसांना दिली. आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलिस या युवकाच्या ऑफिसपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने घटनेची माहिती दिली. कर्जासाठी घेतलेले तीन लाख रूपये परत करणे त्याला शक्य नाही असे त्या युवकाने सांगितले. तो एका आयटी कंपनीत काम करत असून त्याला केवळ वीस हजार रूपये पगार मिळतो. त्याला कर्ज फेडणे शक्य नसल्याचे युवक म्हणाला. तसेच, यापूर्वी देखील त्याने ट्रेनच्या पुढे उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेही त्याने सांगितले. पोलिसांनी युवकाला पालकांच्या स्वाधिन करून काळजी घेण्याचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.