Maharashtra Farmers
Maharashtra Farmers Dainik Gomantak
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...

दैनिक गोमन्तक

Maharashtra Farmers : मागील काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने (Maharashtra Rain Update) थैमान घातले आहे. या पावसामुळे दैनंदीन जीवनासोबतच शेतीवर देखील वाईट परिणाम होताना दिसत आहे. यामध्ये पावसाळी कांद्याचे (Onion) प्रचंड नुकसान झाले आहे. आता पावसाळी कांदा मातीमोल दराने विकला जाऊ लागला असून हजारो – लाखो रुपये खर्च करून आणि मेहनत घेऊन घेतलेले पीक आता कवडीमोल दरात विकावे लागत आहे. यामुळे राज्यातला शेतकरी (Farmers) आर्थिक संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसात कांद्याचे पीक पूर्णपणे भिजून गेल्यामुळे आता या पिकातून शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चदेखील निघत नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांवर २ ते ३ रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरपूर बाजारात कांद्याची मोठी आवक झाल्याने दर पडले होते. आज कमी आवक होऊनही दरात फार सुधारणा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे.

आपल्या राज्यातून कांदा विक्रीसाठी इतर राज्यांमध्ये जात असतो. पण अवकाळी पावसामुळे कांदा भिजल्यामुळे कांदा विक्रीसाठी जाईपर्यंतच त्याला कोंब येतात किंवा ट्रकमध्येच कांदे कुजून जातात. हा ओला कांदा एका दिवसाहून जास्त टिकत नसून त्यातून काहीच नफा होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT