Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Panaji News : कळंगुट येथील जाहीर सभेत मतदारांना भावनिक साद
Ramakant Khalap
Ramakant KhalapDainik Gomantak

Panaji News :

पणजी, ७ मे रोजी मतदानाचा दिवस भाऊबीज मानून आपल्याला मतदान करावे, असे भावनिक आवाहन उत्तर गोव्याचे ‘इंडिया’ चे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी मतदारांना केले.

कळंगुट येथील जाहीर सभेत बोलताना खलप म्हणाले की, ‘भाऊबीजे’ला सर्वसामान्यांना भेट म्हणून अनेक मुद्दे मांडायचे आहेत.

म्हापशासारख्या अनेक ठिकाणी ग्राहकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जसे मला तुमचा भाऊ मानतात, तसे मी तुम्हाला माझे भाऊ-बहीण मानतो. मी तुम्हाला विनंती करतो की, ७ मे रोजी भाऊबीज समजून माझ्या कपाळावर टिळक लावण्याऐवजी मतदान यंत्रावर काँग्रेसचे चिन्ह दाबण्यासाठी आपल्या बोटाचा वापर करा. लोकसभेत तुमचा आवाज बनून मी तुम्हाला भाऊबीजेची भेट देईन. सर्वसामान्यांचे व राज्याचे प्रश्न लोकसभेत मांडेन.

Ramakant Khalap
Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

अनेक घरे पाडण्याचा धोका असलेल्या सीआरझेडच्या प्रश्नावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे खलप यांनी सांगितले.

खलप म्हणाले की, म्हापसा अर्बन बँकेने अनेक लोकांना टॅक्सी आणि मोटारसायकल पायलट बाईक खरेदी करण्यास मदत केली आहे.जेव्हा मी टॅक्सी ड्रायव्हर किंवा मोटारसायकल पायलटला भेटतो तेव्हा ते मला म्हणतात ’भाई, तुम्हाला नियोजित ठिकाणी सोडायचे आहे का? हे तुमचे वाहन आहे, कारण ते तुमच्या बँकेतून घेतलेल्या कर्जाचा वापर करून आणले गेले होते’.

सीआरझेड कायद्यामुळे धोक्यात आलेल्या वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी सरकार पोकळ आश्वासने देत असल्याचे हळदोणाचे आमदार आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अ‍ॅड. कार्लोस फरेरा यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष सामान्य माणसाचा विचार करतो. सीआरझेड कायद्यात सुधारणा करून गोव्यातील जुनी घरे कशी वाचवावीत, हेही मी सुचवले होते, असे ते म्हणाले.

ॲड. रमाकांत खलप म्हणाले की, अनेक किनारी भागात विजेच्या कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे उपकरणांचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत.

पर्यटन व्यवसायातील भागधारकांना परवाने देण्याबाबत तसेच व्यापाऱ्यांना त्रास न देण्याचे आवाहनदेखील खलप यांनी केले.

किनारपट्टीवरील डान्सबार आणि वेश्या व्यवसायाचा निषेध केला आणि अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे सांगून कळंगुट असोसिएशनचे मैदान सरकारने बळकावल्याचा आरोपही त्यांनी केला.

पराभवाच्या भीतीनेच देताहेत धमकी!

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही अनेकांना व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली आहे. त्यांनी बँक ताब्यात घेतली आणि ती संपवली. आणि आता २० वर्षांनंतर जेव्हा भाजपला वाटते की, उत्तर गोव्याची जागा आपण गमावत आहोत, तेव्हा ते आपल्याला बँक प्रकरण पुन्हा उघडण्याची धमकी देत आहेत.

पराभवाच्या भीतीमुळेच ते धमकी देत आहेत. मी त्यांना हे प्रकरण पुन्हा उघड करण्याचे जाहीर आव्हान देतो, असेही ॲड. रमाकांत खलप म्हणाले. कोणत्याही व्यासपीठावर आपण चर्चेचे आव्हान स्वीकारू,असेही खलप यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com