Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: संजय राऊत ही आमची लांब पल्ल्याची तोफ

उद्धव ठाकरेंकडून कौतूकोद्गार; घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसमोर राऊत हे उत्तम उदाहरण

गोमन्तक डिजिटल टीम

Uddhav Thackeray: संजय राऊत हे आमची तोफ आहेत. ते नुसती तोफ नाहीत तर लांब पल्ल्याची तोफ आहेत, असे कौतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांची बुधवारी सायंकाळी तुरूंगातून जामिनावर मुक्तता झाली होती. त्यानंतर गुरूवारी दुपारी राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कर नाही त्याला डर कशाला. जे घाबरून पक्षातून पळून गेले त्यांच्यासाठी संजय राऊत हा चांगला धडा. संजय हा माझा लढणारा मित्र आहे. त्यांच्या जामिनामुळे न्यायदेवता पक्षपाती नाही, हे दिसून आले आणि हे चांगले लक्षण. कालच्या निकालपत्राचे आचरण करावे. कोर्टाची ऑर्डर देशासाठी मार्गदर्शक आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्र सरकारची पाळीव यंत्रणा झाली आहे. त्यांची विश्वासार्हता संपली आहे. ईडी बंद झाली पाहिजे, असे वाटते. दरोडेखोरांसारखे काम या यंत्रणा करत आहेत. त्यामुळे या यंत्रणा बंद का करू नयेत, असा प्रश्न लोकांनी सरकारला विचारला पाहिजे.

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

भारत जोडो यात्रेसाठी मला राहुल गांधींचा फोन आला होता. मी जाणार नाही, नसलो तरी आदित्य जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही यावेळी राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत चालणार असल्याचे स्पष्ट केले. राऊतांबाबत बोलताना त्यांनी टायगर इज बॅक आणि राऊत इज नॉटआऊट अशी कोटीही केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, तुरूंगातून बाहेर पडायला अडीच तास लागले. लोक टीव्ही बघून रस्त्यावर उतरली. हे शिवसेनेवरचे लोकांचे प्रेम आहे. हे चित्र पाहून मला आनंद वाटला. आणि शिवसेना एकच आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. जामिन दिल्यावर मी कोर्टाचे आभार मानले. त्यानंतर कोर्ट म्हणाले की, तुमच्याबाबत अन्याय झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय दिला नसता तर न्यायदेवतेवरील विश्वास उडाला असता. आदित्यचा फोन आला. आज गळाभेटही झाली. तेजसचा कालच फोन आला होता. तो आज बाहेर जाणार असल्याने त्याने कालच फोन करून विचारपूस केली.

तुरूंगातील अनुभवांवर राऊत लिहिणार पुस्तक

राऊत म्हणाले, तुरूंगात सावरकर राहिले, टिळक राहिले. ते कसे राहिले असतील. तुरूंगात एकांतवास असतो. पण मी लिहिणारा माणूस आहे. या अनुभवांवर पुस्तक लिहिले आहे. मी दोन पुस्तके लिहिली आहेत. काही गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. मी डायरीत काही नोंदी केल्या आहेत. ते लोकांपर्यंत नेईन, असे राऊत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT