Shivsena Dasara Melava Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्याचा वादही हायकोर्टात; शिवसेनेकडून अर्ज दाखल

Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेनेचा दसरा मेळावा वाद हायकोर्टात गेला आहे. मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याला परवानगी दिली नसल्याने शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून थोड्याचवेळात दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. येत्या 5 ऑक्टोबरला दसरा मेळावा असल्याने शिवसेनेच्या हातात अगदी थोडाचवेळ शिल्लक आहे. त्यामुळे अर्जाची प्राथमिक माहिती देऊन सुनावणीसाठी तातडीची तारीख देण्याची विनंती शिवसेनेतर्फे कोर्टाला केली जाऊ शकते.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वीच शिवसेने महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी मैदानासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही.

परवानगी न देण्यासाठी राज्य सरकारचा दबाव

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेचे विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी केला. एक महिन्यांचा कालावधी झाला तरी परवानगीबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

दुसऱ्या गटाने बीकेसीसाठी परवानगी मागितली होती, त्यांना मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. पण आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचं सांगितलं जातंय. पण त्याचा इथे काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावर मेळावा घेतला जाणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

शिवाजी पार्क मैदानाच्या वापरासाठी करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय का घेतला नाही, याची विचारणा करण्यासाठी मंगळवारी मिलिंद वैद्य, महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांनी जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही का? अशी चर्चा सुरु झाली आहे. पालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय समोर आला आहे. खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, असं विधी विभागच मत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे किंवा ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटात सध्या तणाव असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोणत्याही गटाला परवानगी देऊ नये, असा विचार पालिका अधिकाऱ्यांचा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT