Minister Uday Samant Dainik Gomantak
महाराष्ट्र

'महाविकास आघाडीकडून राज्यसभेबाबत निष्काळजीपणा'- मंत्री उदय सामंत

मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

दैनिक गोमन्तक

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला स्विकाराव्या लागलेल्या पराभवाचे कारण देताना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निष्काळजीपणा झाला असल्याने अपेक्षित यश न मिळता अनपेक्षित असलेल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले आहे. (Uday Samant comment on Mahavikas Aghadi and rajya sabha election 2022 )

असे असले तरी आगामी विधानपरिषदेत असे चित्र असणार नाही. असे ही ठामपणे सांगितले. तसेच राज्यसभा निवडणुकीत गणितं कोणी जुळवली हे अख्ख्या देशाने बघितलं, असं म्हणत त्यांनी भाजपावर ही निशाणा साधला. ते रत्नागिरी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सामंत बोलत होते.

विधानपरिषदेची निवडणूक 20 जूनला होतं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून सचिन अहीर आणि पाडवी यांना उमेदवारी दिलीय. आमचे दोन्ही सदस्य विधान परिषदेत जातील. असा ठाम विश्वास ही सामंत यांनी व्यक्त केला.

विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे घाबरणार नाही, उलट ते दौरा यशस्वी करून परत येतील, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी सामंत यांनी धोपेश्वर रिफायनरीबाबत ही भाष्य केले. ते म्हणाले की, बेरोजगारीचा प्रश्न पाहता तेथील जनतेला हा प्रकल्प हवा असेल तर मुख्यमंत्री या प्रकल्पाचा विचार करतील,”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT