Actor Arrested in Visakhapatnam for Murder Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: वासनेच्या भरात अभिनेत्याचं क्रूर कृत्य! मोलकरणीचा शरीर संबंधास नकार; नराधमानं पोट, छाती आणि गळ्यावर वार करत केली हत्या

Actor Arrested in Visakhapatnam for Murder: ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एका टीव्ही अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या महिलेची हत्या केल्याचे उघड झाले.

Manish Jadhav

Thane Crime News: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एका टीव्ही अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या महिलेची हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी आरोपी अभिनेता आशिष मेश्राम याला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून शुक्रवारी बेड्या ठोकल्या. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अभिनेत्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या घटनेने परिसरात आणि टीव्ही सृष्टीत मोठी खळबळ उडाली.

मृत महिला गेल्या तीन वर्षांपासून आशिष मेश्रामच्या घरी काम करत होती. ती विवाहित असून तिला पती आणि चार मुले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती आठ-नऊ घरांमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होती. तिचा पती चप्पल दुरुस्तीचे काम करतो, तर मोठा मुलगा खासगी कंपनीत नोकरीला आहे. सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड बिल्डिंगमध्ये बुधवारी संध्याकाळी ही थरारक घटना घडली.

कामावर गेलेली महिला अचानक घराच्या दरवाजावर रक्ताच्या थारोळ्यात आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. शेजारील एका महिलेने तिला पाहिले आणि आरडाओरडा करुन लोकांना बोलावले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आरोपीने तिच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले होते.

तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आशिष मेश्राम सोसायटीत येताना आणि जाताना अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसला. हत्येनंतर तो फरार झाला होता, परंतु तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला विशाखापट्टणम येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष गेल्या अनेक दिवसांपासून पीडित महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करत होता. महिलेने वारंवार नकार दिल्याने तो तिचे मानसिक आणि शारीरिक छळ करत होता.

विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात आरोपीने महिलेच्या मुलाला फोन करुन धमकी दिली होती की, जर तुझ्या आईने माझ्याकडे काम करणे बंद केले किंवा माझी मागणी मान्य केली नाही, तर मी तिला जीवे मारीन. त्यावेळी मुलाने आशिषला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण आशिषच्या मोठ्या भावाने मध्यस्थी करुन 'आशिष आता त्या फ्लॅटमध्ये राहत नाही' असे खोटे सांगून कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. याच विश्वासावर महिला पुन्हा कामावर जाऊ लागली, मात्र आशिष तिथेच दबा धरुन बसला होता आणि संधी मिळताच त्याने तिचे आयुष्य संपवले. या क्रूर कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस आता पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT