Today people will sing national anthem together in Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: आज 11 वाजता सामुहिक राष्ट्रगीतामध्ये सहभागी व्हा, सरकारचे जनतेला आवाहन

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज बुधवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनात सहभागी व्हावे

दैनिक गोमन्तक

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारने बुधवारी सकाळी 11 वाजता सामुहिक राष्ट्रगीतामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले आहे. हे गायन सकाळी 11 वाजता सुरू होऊन 11 वाजून 1 मिनिटांनी संपणार आहे. सरकारने हे सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी अनिवार्य केले आहे. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे. (Today people will sing national anthem together in Maharashtra)

राज्य सरकारने काय आदेश दिले आहेत

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या आठवड्यात याबाबत आदेश जारी केला होता. त्यात राज्य सरकारचे सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सर्वांनी सहभागी होणे बंधनकारक असल्याचे या आदेशात म्हटले आहे. 'त्याचबरोबर सर्व नागरिकांनीही या गायनात सहभागी होणे अपेक्षित आहे. खासगी आस्थापने, व्यापारी आणि इतर सरकारी विभागांनी केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सरकारी विभागांनीही सहभाग घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी मोकळ्या मैदानात एकत्र येणे अपेक्षित आहे. हा केंद्र सरकारच्या 'स्वराज महोत्सवा'चा एक भाग असल्याचे आदेशात म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत उत्सव

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत सरकार विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 15 ऑगस्टपर्यंत देशात घरोघरी तिरंगा फडकवण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये लोकांनी घरोघरी तिरंगा फडकावला. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रम केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT