CM Eknath Shinde  ANI
महाराष्ट्र

'हे शिवसेना-भाजपचे सरकार', विधानसभेत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

दैनिक गोमन्तक

Eknath Shinde in Maharashtra Assembly: महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नेते राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. मात्र यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. 'हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार असल्याचे मोठे विधान शिंदे यांनी विधानसभेत केले.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत हे सरकार वाटचाल करत आहे. माझे काही सहकारी आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा उद्धव ठाकरे गटातील काही लोक करत होते, मी त्यांना सांगितलं की, तुम्ही मला त्याचे नाव सांगा, मी त्यांना विमानाने परत पाठवतो.' दरम्यान आज विधानसभेत मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पीएम मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे पुन्हा आभार मानले आहेत.

व्हीपबाबत वाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप सरकारच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत. कारण सभापतीसाठी मतदान झाल्यानंतर आता आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सध्या कोणत्या गटाच्या आमदारांना शिक्षा होणार हे स्पष्ट झाले नसले तरी कायदेतज्ज्ञांच्या मते सध्या उद्धव ठाकरे गटाचे पारडे जड आहे. शिंदे गटाचे आमदार कोणत्याही पक्षात विलीन झालेले नसल्यामुळे, अशा परिस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात. हे पाहता आता ही लढत खरी शिवसेनेत सुरू झाली आहे. त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत, त्यामुळेच त्यांना खरी शिवसेनेची ओळख मिळाली पाहिजे, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. पक्ष अद्याप तुटलेला नाही, असे शिवसेना नेते सांगत आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झआली आहे, त्यांनी बहुमताचा आकडा पार केला. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली आणि या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT