Ajit Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अल्टिमेटम द्यायला हे तुमचं घर नाही - अजित पवार

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

दैनिक गोमन्तक

मुंबई : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत भोंगा आणि हनुमान चालीसा मुद्यावरुन राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. यासाठी राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. यावरुनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं असून कड्या शब्दात समज ही दिली आहे. (This is not your house to give ultimatum - Ajit Pawar )

भोंगे उतरवण्याची मागणी करत मनसे आक्रामक झाली आहे. याच मुद्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद प्रसार माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्याचं आवाहन केलंय. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक असल्याचं म्हटलंय.

“आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार मानले जातात. आपण रोज त्यांच्या विचारांचं स्मरण करतो. परंतु त्यांच्या विचारांचं स्मरण करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या. राज्यातील धार्मिक स्थळांनी भोंगे वापरण्याबद्दल परवानगी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळावी, कोणीही लाऊडस्पीकरचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू नये. असं ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच दिल्लीतील जहांगिरपुरीत झालेल्या दंगलीनंतर युपीमध्ये योगी सरकारने गोरखपूरमध्ये गोरखमठावरील भोंगे उतरवले. त्यानंतर राज्यातील इतर काही ठिकाणी आवाहन केल्यानंतर मंदिर आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले. तिथे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, असंही अजित पवार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT