Congress leader MLA Pranati Shinde dainik gomantak
महाराष्ट्र

'योगी आणि महाराजांच्या राजकारणातील प्रवेशामुळे देश उद्ध्वस्त होतोय'

योगी आणि महाराजांचे स्थान राजकारणात नसून मठात : प्रणती शिंदे

दैनिक गोमन्तक

सोलापूर : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून पाच पैकी चार राज्यात भाजपने बाजी मारली आहे. तर पंजाबमध्ये आप चे सरकार येणार आहे. असे असताना देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसची पिच्छेहाट झालेली दिसत आहे. तर महाराष्ट्रात सत्ताधिकारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष सुरू आहे. यादरम्यान सोलापूरच्या एका काँग्रेस आमदाराचे एक अजब विधान समोर आले असून त्यामुळे देशातील योगी आणि महाराज यांच्यात वादळ उठण्याची तर त्या विधानामुळे काँग्रेसवर टिका होण्याची शक्यता आहे. हे विधान काँग्रेस नेत्या प्रणती शिंदे यांनी केले असून त्यांनी भाजपवर ही जोरदार हल्लाबोल केला आहे. (The country is falling apart due to the entry of Yogi and Maharaj into politics)

यावेळी काँग्रेस (Congress) नेत्या प्रणती शिंदे यांनी, ‘योगी आणि महाराजांचे स्थान राजकारणात नसून मंदिर (Mandir) आणि मठात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे विधान सोलापूर (Solapur) येथील एका सभेला संबोधित करताना केले आहे. तसेच त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना, देशातील पाच तर विशेषत: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) निवडणुका लक्षात घेऊनच वादग्रस्त कृषी कायदे केंद्राने मागे घेतले. त्यामुळेच भाजपला (BJP) आरामात बहुमत मिळवल्याचे प्रणती शिंदे यांनी म्हटले आहे.

तर प्रणती शिंदे म्हणाल्या की, योगी (Yogi) आणि महाराज जेव्हा-जेव्हा राजकारणात आलेत तेंव्हा देशात उलथापालथ झाली. देश उद्ध्वस्त होण्याचा मार्गावर गेला. मात्र 'आम्हाला योगी आणि महाराजांबद्दल आदर आहे. पण त्यांचे स्थान राजकारणात (Politics) नसून ते मंदिर आणि मठात आहे.

तसेच, काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहणे गरजेचे असून लोकशाही (Democracy) जिवंत ठेवायची असेल तर कामाला महत्त्व द्यायाला हवे असे प्रणती शिंदे म्हणाल्या. त्याचबरोबर मोदी सरकारची (Modi Government) खिल्ली उडवत त्या म्हणाल्या, "केंद्राने कृषी कायदे (Agricultural laws) रद्द करण्याआधी एक वर्ष वाट का पाहिली? ज्यामुळे 700 लोकांचा जीव गेला. तुम्हाला लाज वाटली पाहिजे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT