Gun  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत एसआरपीएफ जवानाने केला आत्महत्तेचा प्रयत्न

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

दैनिक गोमन्तक

राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने मंगळवारी मुंबईतील डोंगरी भागात स्वत:वर गोळी झाडली. 36 वर्षीय जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली. बंदुकीच्या आवाजाने आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी जखमी जवानाला तत्काळ दवाखान्यात (Hospital) भरती केले. जवानाला गंभीर दुखापत झाली आहे. (Maharashtra Latest News)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पुष्कर शिंदे असे जखमी जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, एसआरपीएफ जवान पुष्कर शिंदे याची मंत्रालयात नियुक्ती झाली होती. 6 जानेवारीपासून तो मंत्रालयात काम करत होता. मंगळवारी त्याने एका खोलीत जाऊन आपल्या एसएलआर रायफलने स्वत:च्या गळ्यात गोळी झाडून घेतली. पुष्कर शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबद्दल अजून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. पुष्कर शिंदे याच्या मित्रांनी देखील त्याच्या आत्महतेच्या प्रयत्नाबाबत चिंता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT