Ganesh Utsa Dainik Gomantak
महाराष्ट्र

गणेशभक्तांसाठी दादरहून धावणार 'स्पेशल मोदी एक्सप्रेस': नितेश राणे

ही रेल्वे दादर (Dadar) ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोनाचं (Covid 19) सावट काहीसं ओसरलं असताना पुढच्या महिन्यात गणेशउत्सासारखा मोठा सण येऊन ठेपला आहे. यातच आता यंदाच्या गणेशउत्सासाठी (Ganesh Utsa) कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आमदार नितेश राणे यांनी कोकणात गणेशउत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस (Special Modi Express) सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. 1 हजार 800 गणेशभक्तांसाठी या रेल्वेमध्ये मोफत प्रवास, एक वेळच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे. ही ट्रेन दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी आपली सीट आरक्षित करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत बुकिंग करावं लागणार आहे.

दरम्यान, एकीकडे देशावर कोरोनाचे सावट असताना दुसऱ्या बाजुने कोकणावर समुद्री संकट तसेच पावसाने देखील थैमान घातले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील कोकणी माणुस आपले उत्सव आणि परंपरां विसरत नाही. आजपर्यंत कित्येक नैसर्गिक संकटं आली तरी देखील कोकणकर सगळे उत्सव साजरे करत आले आहेत. सगळ्या महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव यंदा शांततेत साजरा करण्यात येणार असा तरी देखील अनेक जण कोकणाकडे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभुमीवर कोकणात जाण्यासाठी भारतीय रेल्वेकडून एकून 150 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT