Sindhudurg Shiroda Beach Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg Shiroda Beach: शिरोडा- वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले, चौघांचा वाचवण्यात यश

Shiroda Velagar drowning: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर दुपारी एक मोठी दुर्घटना घडली.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. फिरायला गेलेल्या आठ पर्यटकांचा समुद्राच्या लाटांमध्ये ओढून बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापैकी तिघांचे मृतदेह किनाऱ्यावर सापडले असून चौघांचा वाचवण्यात यश आलं आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. सर्व पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

वेळागर समुद्रकिनारा हा सिंधुदुर्गमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र या भागात योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याची तक्रार स्थानिकांकडून सातत्याने केली जात आहे. पर्यटकांना पोहण्यास बंदी असूनही अनेकजण लाटांचा अंदाज न घेता पाण्यात उतरतात, ज्यामुळे अपघाताच्या घटना घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT