जिल्हादंडाधिकारी कार्यालय  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg: त्रिपुरा घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मनाई आदेश

आदेशाचे जो कोणी उल्‍लंघन करील तो महाराष्‍ट्र पोलीस (Maharashtra Police) अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: त्रिपुरा (Tripura) घटनेच्या अनुषंगाने सुरु असलेली आंदोलने, एस.टी. (ST) संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने होऊन तसेच इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने-निदर्शने झाल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी (District Magistrate) के.मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत आदेश लागू केले आहेत.

या आदेशात म्हटले:

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात विविध संघटनातर्फे आंदोलने सुरु आहेत. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. वरील घटनेच्या निषेधार्थ आपल्या जिल्ह्यात आंदोलने व निदर्शने झाल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच एस.टी. परिवहन विभागातील विविध कामगार/कर्मचारी संघटना यांनी कर्मचाऱ्यांचे मागण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारलेला असून कर्मचारी व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आपल्या जिल्ह्यात एस.टी. चा संप सुरु असून जिल्ह्यात आंदोलने/निदर्शने होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये पेट्रोल-डीझेल, (Petrol-diesel) गॅस दरवाढ व इतर कारणावरून विविध संघटना एकमेकांवर टीका टिपणी करत आहेत. सदर कारणावरून विविध संघटनाकडून आंदोलने/निदर्शने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणती आहेत कलमे:

तरी या विविध कारणावरुन सिंधुदुर्ग जिल्‍हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्‍हयातील कायदा व सुव्‍यवस्‍था परिस्थिती अबाधित रहावी याकरिता सिंधुदुर्ग जिल्‍हयाचे संपूर्ण भूभागात महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (अ) ते (फ) आणि 37(3) प्रमाणे दिनांक 17/11/2021 रोजी 17.00 वाजलेपासून ते दिनांक 30/11/2021 रोजी 24.00 वा. पर्यंत मनाई आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

कायदा व सुव्‍यवस्‍था प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे अशी माझी खात्री झालेली आहे. त्‍याअर्थी, मी के. मंजुलक्ष्‍मी, जिल्‍हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग मला प्राप्‍त असलेल्‍या शक्‍तींचा वापर करुन महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37(3) नुसार दिनांक 17/11/2021 रोजी 17.00 वाजलेपासून ते दिनांक 30/11/2021 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्‍हयाचे संपूर्ण भूभागात खालील कृत्‍य करण्‍यांस मनाई करीत आहे.

कलम 37(1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. सभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3) नुसार जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे. हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.

या कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्‍यांचे अधिकार तसेच ध्‍वनीक्षेपक वाजविण्‍यांस परवानगी देण्‍यांचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्‍यांनी प्राधिकृत केलेल्‍या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्‍हयातील पोलीस ठाणे (Police station) प्रभारी अधिका-यांस राहील.

वरील आदेशाचे जो कोणी उल्‍लंघन करील तो महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT