Minister Uday Samant Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून सुरु

यावर्षीपासून 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरु होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच वैद्यकिय महाविद्यालयात (first government medical college in sindhudurg) यंदाच्या वर्षापासून अभ्यासक्रम सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. यावर्षीपासून 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरु होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत माहिती देताना सामंत म्हणाले, सिंधुदुर्गात शासकीय महाविद्यालय सुरु व्हावं यासाठी कोकणविसांची मागील 30 ते 35 वर्षापासूनची इच्छा होती. 996 कोटी रुपयांच्या योजनेमधून या महाविद्यालयाचं काम सुरु झालं. त्यानंतर यंदा प्रवेश होणार की, नाही अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत. परंतु मला सांगताना आनंद होत आहे की, कोकणातील शैक्षणिक विकासाचं एक नवे दालन यंदाच्या वर्षीपासून सुरु होत आहे. 100 विद्यार्थ्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अॅडमिशन यावर्षीपासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी मेडिकलच्या शिखर संस्थेने यासंबंधीची परवानगी दिली आहे.

शिवाय, या वैद्यकीय महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य सोयीसुविधांवर स्थानिक प्रशासनाने काम सुरु केले आहे. विशेष म्हणजे हे वैद्यकीय महाविद्यालय आणि चीपी विमानतळ यावर्षीपासून सुरु होत आहे. आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाला देखील शिखर संस्थेने यास परवानगी दिली आहे. तसेच, कोरोनाचं कोणतही कारण न देता ही विकासकामे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत, असही यावेळी सामंत यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT