Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shiv Sena च्या 12 बंडखोर खासदारांना Y कॅटेगरीची सुरक्षा, शिंदे गटात होणार सामील

Maharashtra Politics: महाराष्ट्रात शिवसेनेतील 12 बंडखोर खासदारांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात शिवसेनेतील 12 बंडखोर खासदारांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. याच बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीपासून ही सुरक्षा देण्यात आली आहे. या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल शेवाळे यांना नेते म्हणून मान्यता देण्याची विनंती केली होती.

वास्तविक, शिवसेनेचे (Shiv Sena) 18 पैकी 12 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. हे सर्व खासदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन करु शकतात. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा जाहीर करु शकतात, अशीही चर्चा होती. शिवसेनेच्या शिंदे गटाने सोमवारी बोलावलेल्या बैठकीला 19 पैकी 12 शिवसेनेचे खासदार उपस्थित राहिले होते.

याउलट, उद्धव ठाकरे गटाने सोमवारी संध्याकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज सादर केला, ज्यामध्ये विनायक राऊत यांची संसदीय पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षापासून फारकत घेतलेल्या गटाचे कोणतेही प्रतिनिधित्व विचारात घेऊ नका, असे आवाहन पक्षाने केले आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राऊत यांनी सभापतींना पत्र सादर केले असून, त्यात राजन विचारे यांना मुख्य प्रतोद करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे, शिवसेनेच्या या 12 बंडखोर आमदारांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय श्रेणीची सुरक्षा दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीबरोबरच मुंबईतही (Mumbai) ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. सध्या सर्वांचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या लोकसभेच्या कामकाजाकडे लागले आहे. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष काही मोठा निर्णय घेतील की नाही हे येणारा काळच सांगेल.

शिवाय, काही मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत आणखी एक बातमी समोर आली आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचले आहेत. 12 नव्हे तर 18 खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या एकदिवसीय दौऱ्याचे कोणतेही कारण दिलेले नाही किंवा दुजोराही दिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT