Sanjay Raut News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

50-50 करोड रुपयांना विकले गेले 'बिग बुल'; सामनातून बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगात उद्धव ठाकरे कॅम्प आणि शिंदे कॅम्पच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगात उद्धव ठाकरे कॅम्प आणि शिंदे कॅम्पच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये बंडखोर आमदारांवर कडाडून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपलाही चांगलेच फैलावर घेतले आहे. गुवाहाटी प्रकरणाने अखेर भाजपची धोबीपछाड उघड झाल्याचे संपादकीयमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) आमदारांची बंडखोरी ही त्यांच्या पक्षातर्गंत बाब असल्याचे लोक सांगत होते. तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची वडोदरामधील गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी झाले होते. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारकडून 15 बंडखोर आमदारांना ‘वाय’ श्रेणीची विशेष सुरक्षा देण्याचे आदेश जारी करण्यात आले. हे 15 आमदार म्हणजे जणू लोकशाही आणि स्वातंत्र्याचे रक्षक आहेत. त्यामुळेच त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ, असे केंद्राला वाटते का? असा सवाल देखील सामनातून विचारण्यात आला आहे.

वास्तविक, हे लोक बिग बुल आहेत किंवा 50-50 कोटींना विकले जाणारे मोठे बंडखोर आहेत. हा लोकशाहीला कलंक आहे. त्या कलंकाचे रक्षण करण्यासाठी हा काय गोंधळ? हे आमदार मुंबई-महाराष्ट्रात यायला घाबरतात का? मुंबईत उतरताच पुन्हा आपल्या स्व:पक्षात सामील होतील या चिंतेने केंद्र सरकारने (Central Government) त्यांना ‘केंद्रीय’ सुरक्षा देऊन एकप्रकारे कैद करुन ठेवले आहे.

तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष रविवारी अधिक तीव्र झाला. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना विधानसभेचे सदस्यत्व सोडून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले. दरम्यान, कार्यकर्त्यांची आंदोलने सुरुच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT