Shalini Thackeray Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

"सबको समझा; आपको समझा क्या..?? - शालिनी ताईंचा उद्धव भावोजींना टोला

पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे गणित चुकले; एकनाथ शिंदे नॉट रिचेबल

दैनिक गोमन्तक

विधान परिषद निवडणुक निकालानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. तर गुजरातमधील हॉटेलमध्ये महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि शिवसेना नेते थांबले असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. यावरुन राष्ट्रवादीने तटस्त भुमिका घेत शिवसेना काय निर्णय घेणार यानंतर आम्ही आपली भुमिका स्पष्ट करु असा सावध पवित्रा घेतला आहे. (Shalini Thackeray criticizes Chief Minister Uddhav Thackeray )

शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याचं आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना "सबको समझा. आपको समझा क्या..?? असा सांकेतिक भाषेत टोला लगावला आहे. त्यामूळे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ येणार का ? अशी स्थिती सध्या आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेब आहेत. त्यामूळे ते शिवसेना आमदारांसह भाजपमध्ये उडी घेणार का ? असा ही सवाल आता राजकिय वर्तूळात विचारला जात आहे. यातच काही वेळापुर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असे म्हटले आहे.

उरतो प्रश्न असा की, शिवसेनेचे नॉट रिचेबल नेते आणि एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या कारणाने शिवसेनेवर नाराज आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाविकास आघाडीसोबत काँग्रेसला घेण्यास या नेत्यांचा विरोध असल्याची बाब समोर आली आहे. असे असले तरी या नेत्यांनी अध्याप कोणत्या ही माध्यमाशी चर्चा केली नसल्याने महाविकास आघाडीचे भविष्य काय ? असाच प्रश्न सध्या राजकिय वर्तूळात विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT