Sindhudurg Banda Two Bus Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg: सिंधुदुर्गात भीषण अपघात! एसटी बसने 100 फूट फरफटत नेलं, 19 प्रवासी जखमी

Sindhudurg Banda Two Bus Accident: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (३० जून) सकाळच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात घडला. हा अपघात बांदा-दोडामार्ग मार्गावरील पानवळ या ठिकाणी झाला.

Sameer Amunekar

Sindhudurg Banda Two Bus Accident

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (३० जून) सकाळच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात घडला. हा अपघात बांदा-दोडामार्ग मार्गावरील पानवळ या ठिकाणी झाला. दोन्ही बसचा समोरासमोर झालेल्या धडकेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, फुकेरीहून बांद्याच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि उस्मानाबादहून पणजीकडे जाणारी दुसरी एसटी बस यांची पानवळ येथील वळणावर समोरासमोर धडक झाली.

वळणावर अचानक समोरून बस येताना दिसल्यामुळे फुकेरी बसचा चालक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, समोरून आलेल्या बसने जोरदार धडक दिली आणि फुकेरी बस जवळपास १०० फूट फरफटत नेली.

या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले असून, फुकेरी बसमध्ये असलेले काही महाविद्यालयीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना तत्काळ बाहेर काढत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने तातडीने मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या घटनेमुळे पानवळ परिसरात काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बस रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहने थांबून राहिली होती. अपघाताच्या ठिकाणी स्थानिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी आणि एसटी प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

सध्या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून, काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे. हा अपघात नेमका कसा घडला? त्यास जबाबदार कोण? याचा तपास पोलीस आणि एसटी प्रशासन करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT