Sindhudurg News Dainik Goamantak
महाराष्ट्र

Sindhudurg: झाड तोडताना कापली मांडी, साटेली - भेडशीत युवकाचा मृत्यू; गोव्यात होता कामाला

Dodamarg Sindhudurg News: झाडाची फांदी तुटल्यानंतर त्याचे कटर मशीनवरील नियंत्रण सुटले. यामुळे कटर मशीन नागेशच्या मांडीवर आली व त्याची रक्तवाहिनी कापली गेली.

Pramod Yadav

दोडामार्ग: झाड तोडताना कटर मशीनवरील नियंत्रण सुटल्याने मांडीची रक्तवाहिनी कापून ४० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे मंगळवारी (१५ एप्रिल) ही घटना घडली. युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

नागेश लाडू मयेकर (वय ४०, रा. साटेली, भेडशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. नागेश गोव्यातील एका खासगी कंपनीत कामाला होता. शेतीच्या कामानिमित्त तो गावाकडे आला असता ही घटना घडली.

नागेश घोटगे येथे कटर मशीनच्या मदतीने झाड तोडण्यासाठी गेला होता. यावेळी झाडाची फांदी तुटल्यानंतर त्याचे कटर मशीनवरील नियंत्रण सुटले. यामुळे कटर मशीन नागेशच्या मांडीवर आली व त्याची रक्तवाहिनी कापली गेली.

नागेशला जखमी अवस्थेत साटेली, भेडशी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. नागेशच्या पायाला झालेल्या जखमेत खूप रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. नागेशच्या अकाली मृत्यूमुळे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT