Sanjay Raut Alleges on Kirit Somiya Dainik Gomantak
महाराष्ट्र

'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी सोमय्यांवर मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. काल रात्री 10 च्या सुमारास ट्विट करत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे आज सकाळी त्यांनी सोमय्यांवर मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. (Sanjay Raut slams Kirit Somiya)

राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड संदर्भातील 5600 कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांचा हात असल्याचा दावा केला आहे. राऊतांच्या आरोपानुसार, किरीट सोमय्यांनी त्यातील लाखों रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले आहेत.

“एनसएसईएलच्या 5 हजार 600 कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी घरी गेले. तमाशा केला. 2018-19 असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले,” असा आरोप राऊत यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. ट्विटरवरुनही यासंदर्भात राऊत यांनी पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Water Issue: गटारावरील लादीवरही कीड आढळल्याने घबराट! वाळपईत चिंतेचे वातावरण, यापूर्वी पाण्यात आढळलेल्या कीडीशी साम्य

नीट-यूजी फेरपरीक्षा; काही मिनिटांच्या उशिरामुळे दोघांना प्रवेश नाकारला, म्हापसा केंद्रावर 549 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Qatar Gas Plant Explosion: काळाचा भीषण घाला! कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; 54 जण रक्ताच्या थारोळ्यात, 18 अजूनही बेपत्ता

FIFA World Cup 2026: 92 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! फिफा विश्वचषकात इजिप्तचा ऐतिहासिक पहिला विजय; न्यूझीलंडचा 3-1 ने पराभव

Goa Crime: वाळपईत नागरिकासह पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; एकास अटक, बार परिसरातील वादाचे रूपांतर मारहाणीत

SCROLL FOR NEXT