Sanjay Raut live updates Dainik Gomqantak
महाराष्ट्र

Sanjay Raut Press Conference: 'किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल'

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नेमका कोणता गौफ्यस्फोट करणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. एकेकाळचे सख्ये भाऊ असणारे भाजप आणि शिवसेना आत्ता पक्के वैरी झाले आहेत. शिवसेना आणि भाजपमधील राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच शिवसेनेची कमान संभाळणारे खंदे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपमधील 'साडे तीन' नेते जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता भाजपमधील (BJP) ते नेते कोण, याबाबत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. (Shivsena Press Conference Live Updates)

राज्यातील महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नेमका कोणता गौफ्यस्फोट करणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. यातच आता राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील नेत्यांवर शरसंधान साधले.

संजय राऊत म्हणाले, 'महाराष्ट्र ही गांडूची अवलाद नाही. मराठी माणूस कुणासमोरही झुकणार नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणाविरुध्द उभे राहण्याची वेळ आली आहे. आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून मोदी सरकारकडून केला जात आहे. तसेच महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या विरोधात या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही सरकारमधून बाहेर पडला नाही तर, तुम्हाला टाईट केले जाईल, अस देखील मला दिल्लीमध्ये असताना भाजपमधील काही राजकीय नेत्यांनी सांगितले आहे.'

ते पुढे म्हणाले, 'सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडले. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहेत. भाजपने महाराष्ट्रात नालायकपणाचे राजकारण सुरु केले आहे. आजची पत्रकार परिषद आम्ही ईडीच्या कार्यलयासमोर घेणार होतो.'

तसेच ते पुढे म्हणाले, 'राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात तथ्यहीन प्रकरणे समोर येत आहेत. तसेच किरीट सोमय्या शिवसेनेवर खोटे आरोप करत आहे. मराठी भाषेच्या विरुध्द हेच किरीट सोमय्या न्यायालयामध्ये गेले होते. किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे 19 बंगले दाखवावेत मी राजकारणातून सन्यांस घेतो. माझ्या आयुष्यात मी कधीही खोटे राजकारण केले नाही. माझ्या 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करत आहे. 12-12 तास सामान्य लोकांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र गुजरातमध्ये 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला त्याबद्दल भाजप नेते काही बोलत नाही.'

दरम्यान, राज्यात शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे राज्यात सर्वात जास्त जागा मिळून देखील भाजपला सत्तेपासून वंचित रहावे लागले होते. सध्या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सध्या मनी लॉंड्रीग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT