ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ Dainik Gomantak
महाराष्ट्र

विधवा महिलांसाठी ग्रामविकास विभागाच्या 'या' नव्या योजना

युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक (Agricultural) प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग, उत्पादक यांचे प्रशिक्षण तसेच विविध व्यवसायांचे (businesses) मोफत व निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष मृत्यु झाल्याने घरातील विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ सुरु केली आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) ग्रामीण भागातील (Rural areas) गरीब महिलांना उपजीविकेच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न सुरु आहे.ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयानुसार गावोगावी समिती करून एकल, विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समूहामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नियमानुसार या महिलांच्या किमान पाच सदस्यांच्या स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूहाला उमेद योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत.

उमेद मधून एकल/विधवा महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देण्यात येतील. तसेच त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक, युवतींना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणास प्राधान्य देण्यात येईल. आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना (Youth) 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग, उत्पादक यांचे प्रशिक्षण तसेच विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT