Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गवरील जगबुडी नदीवरील नव्या पुलाला मोठे तडे; कोकणात पावसाचा जोर कायम!

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Manish Jadhav

कोकणात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने बरसणाऱ्या संततधारेमुळे रत्नागिरीसह शेजारील जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे.

याचदरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खेड भरणे येथील नवीन पुलाला मोठे तडे गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली.

दरम्यान, महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदीवरील पुलाला मोठे तडे गेल्याने या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खेड भरणे पूल धोकादायक बनल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली

आता या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत असल्याचे बोलले जावू लागले आहे. तर परशुराम घाट दरडही कोसळली. चिपळूण बबहादुरशेख नाक्यावरचाही पूल कोसळला.

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर शहरात पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळी प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत पोहोचले आहे. तर अर्जुना नदीपात्रात असलेलं पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT