Ramdas Athawale Vs Shashi Tharoor Dainik Gomantak
महाराष्ट्र

उनका बयान देखकर मुझको आती हँसी...; थरुर यांच्यावर आठवलेंची भन्नाट कविता

अस्खलित इंग्रजी असलेल्या शशी थरूर यांना रामदास आठवले यांनी चुकीचा लिहिलेला Bydget शब्द सुधारण्याचा दिला सल्ला.

दैनिक गोमन्तक

अस्खलित इंग्रजी असलेल्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात ट्विट वॉर रंगले. शशी थरूर यांनी रामदास आठवलेंचा लोकसभेतील एक फोटो शेअर केला आहे. तर काही वेळाने रामदास आठवलेंनी यावर पलटवार करत शशी थरुर यांची शाळाच घेतली. आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी थरुर यांच्यावर थेट कविताच केली.(Ramdas Athawale Vs Shashi Tharoor)

या पत्रकारपरिषदेत रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांच्या संद्रभात उल्लेखनीय बाब म्हणजे शशी थरूर यांची ओळख ही इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखली जाते. यावेळी मात्र रामदास आठवलेंनीच इंग्रजीवरून थरूर यांची कोंडी केली. नागपूर येथील पत्रकार परिषदेत आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून एकदा शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला.

आठवलेंनी केलेल्या कवीतेमुळे आठवले आणि थरुर यांच्यातील हा मिश्कीलपणा हा सध्या नेटीझन्सला चांगलाच मजेशीर घेतला आहे.

ट्विट मध्ये आठवलेंनी म्हटले की,

जिसकी इंग्लिश मैने,

ट्विटरपर देखी

उनका नाम है शशी

उनका बयान दे खकर

मुझको आती हँसी...

थरुर यांचा मिश्कील चिमटा

काही दिवसांपूर्वी शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी गुरुवारी लोकसभेतील एक फोटो ट्विट केला. ज्यात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्पाबाबतच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत, तर त्याच फोटोत दिसत असलेले रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून थरूर यांनी थेट अर्थसंकल्पावरच निशाणा साधला. ते म्हणाले की, सुमारे दोन तासांच्या ‘Bydget debate’ वर अवलंबून राहिल्यानंतरही रामदास आठवलेंच्या चेहऱ्यावरील स्तब्ध आणि अविश्वसनीय भावना सांगतात की, ट्रेजरी बेंचसुद्धा वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवू शकत नाहीत.

आठवलेंचा रिप्लायला थरुरांची कबुली

यावर रामदास आठवले यांनी शशी थरूर यांना उत्तर दिले.तेव्हा त्यांनी चुकीचा लिहिलेला Bydget शब्द सुधारण्याचा सल्ला ही दिला. रामदास आठवले लिहिले की, प्रिय शशी थरूर जी विनाकारण विधाने करताना चुका होणं साहजिक आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नंतर शशी थरूर यांनीही लगेच उत्तर देत आपली चूक मान्य केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, टायपिंगमध्ये चुक झाल्यामुळे असे झाले. त्यांनी सांगितले की, चुकीचे टायपिंग हे वाईट इंग्रजीपेक्षाही मोठी चुक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT