Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raj Thackeray यांची आज पुण्यात सभा; अयोद्धा दौर्‍याच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष

पुण्याचे मनसे प्रदेशाध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सभेला 10 ते 15 हजार लोकं येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. पावसाच्या शक्यतेमुळे खुल्या मैदानात सभा घेण्याऐवजी एका सभागृहात सभा घेण्याचा निर्णय झाला आहे. सभेसाठी गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) निवडण्यात आला आहे. पुण्याचे मनसे प्रदेशाध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सभेला 10 ते 15 हजार लोक येण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray will address rally today ganesh kala krida manch pune news)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी 4 दिवसांच्या पुणे दौर्‍यावर असलेले राज ठाकरे 2 दिवसांतच मुंबईला परतले. काही वर्षांपूर्वी टेनिस खेळताना दुखावलेला पाय पुन्हा त्रास देत असल्याने ते परत आल्याचे सांगितलं जात आहे. या दुखण्यामुळे त्यांनी आगामी 5 जूनचा अयोद्धा दौरा देखील रद्द केला आहे. राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) कडाडून विरोध केला. राज ठाकरेंनी युपीतील संतमहंतांची माफी मागावी आणि नंतरच उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवावे असे आव्हान दिले होते. त्यामुळेही राज ठाकरेंचा दौरा चर्चेत होता.

राज ठाकरेंनी ट्वीट करत अयोद्धा दौरा तूर्तास स्थगित केला आहे अशी माहिती दिली होती. आता हा दौरा कधी, कसा होणार? याबद्दल राज ठाकरे काय बोलणार याकडे मनसैनिक आणि लोकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT