Raj Thackeray And Uddhav Thackeray Speech Shivsena UBT X Handle
महाराष्ट्र

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

Raj Thackeray And Uddhav Thackeray Speech: महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधुंच्या वतीने मराठी विजयी मेळाव्याचे आजोजन करण्यात आले होते.

Pramod Yadav

मुंबई: तब्बल वीस वर्षानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. हिंदी सक्तीचा राज्य सरकारने आदेश मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधू मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. विजयी मेळाव्याला लाखोंच्या संख्येने राज - उद्धव समर्थकांनी हजेरी लावली. यावेळी मराठीच्या घोषणांनी परिसर दुमदूमला.

वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगांवकर, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, अनिल परब, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, मराठी चित्रपट सुष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.

हिंदी सक्तीच्या आदेशाविरोधात या दिवशी (०५ जुलै) भव्य मोर्चा आयोजित करण्याचे ठरले होते. दरम्यान, हिंदी सक्तीचा आदेश मागे घेण्यात आल्यानंतर मोर्चा ऐवजी विजयी मेळावा आयोजित करण्याचे ठरले होते. त्यानुसार हा मेळावा आज मुंबईत पार पडला.

काय म्हणाले राज ठाकरे?

२० वर्षे जे बाळासाहेबांना किंवा अनेक नेत्यांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमले अशी भाषणाची सुरुवात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी भाषणात उद्धव ठाकरे यांचा सन्माननीय असा उल्लेख केला. फक्त मोर्चाच्या घोषणेनेच सरकारने आदेश मागे घेतला, असेही राज म्हणाले. हिंदी सक्तीच्या विरोधात सरकारला वारंवार पत्र लिहली, त्यानंतर दादा भुसे यांनी भेट घेतली, त्यावेळी त्यांना तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र पेटून उठतो त्यावेळी काय होतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल, असेही राज यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांचा सन्माननीय असा उल्लेख करत, भाषणाला सुरुवात केली. मराठीसाठी एकत्र आलो आहोत यापुढे देखील एकत्र राहू, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केली. उद्धव यांच्या या घोषणेनंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. दोन भावांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला, असाही खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT