Sanjay Raut criticism on Raj Thackeray Aurangabad rally Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील ओवेसींचे अवतार, संजय राऊतांची घणाघाती टीका

दैनिक गोमन्तक

Raj Thackeray Rally in Aurangabad: महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वादातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये मोठी सभा होणार आहे. राज ठाकरे शेकडो समर्थकांसह औरंगाबादला पोहोचले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. 100 हून अधिक वाहनांच्या ताफ्यासह ते येथे पोहोचले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. रॅलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याआधीही पोलिसांनी रॅलीला परवानगी देताना अनेक अटी घातल्या आहेत. रॅलीदरम्यान किंवा नंतर मनसे प्रमुखांना आक्षेपार्ह घोषणा, धार्मिक, जातीय आणि प्रादेशिक संदर्भ वापरण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले आहे. 15,000 लोकांना रॅलीत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Sanjay Raut criticism on Raj Thackeray Aurangabad rally)

राज ठाकरेंची आज औरंगाबादेत मेगा रॅली

दुसरीकडे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी हेही औरंगाबादेत आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद येथील घरी इफ्तार पार्टीत सहभागी झाले. इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना इफ्तारसाठी निमंत्रणही दिलं आहे. तसेच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, कोणीही कुठेही रॅली काढू शकतो. औरंगाबादमध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आहे. कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने मुस्लिमबहुल जिल्ह्यात तणाव निर्माण होऊ शकतो. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.

संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली

त्याचवेळी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते हिंदुत्वाच्या नावाखाली भोंदूगिरी करत आहेत. आज 1 मे हा महाराष्ट्र दिनही आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचे राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. भाजपला महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारवर निशाणा साधला होता आणि मशिदींवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्याची मागणी केली होती. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास मशिदींसमोर जोरात हनुमान चालीसा वाजवण्याची धमकी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT