Raj Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली - राज ठाकरे

उगाच कशाला पावसात भिजत बसायचं म्हणत, शरद पवारांना राज ठाकरेंचा टोला

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहिर सभा पार पडत आहे. या सभेपूर्वी मनसेने एक टीझर रिलीज करण्यात आला होता. अजान आणि हनुमान चालिसावर आपल्या विधानांनी चर्चेत आलेले राज ठाकरे रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पालन करून पुण्यात संबोधित करणार आहेत. (Raj Thackeray in Pune)

राज ठाकरे यांच्या सभेला राज्यभरातून मनसे सैनिक दाखल झाले आहे. गणेश कला क्रिडा मंच सभागृहात राज ठाकरेंच्या नावाच्या गर्जना सभागृहात होत आहे. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरवातीला सभागृहात उपस्थित पुण्यातील अंध विद्यार्थाांना मंचावर बोलावून घेतले आणि त्यांचा सन्मान केला.

आपल्या सभांना हॉल परवडत नाही म्हणत ठाकरे यांनी पुण्यातल्या अनेक मैदानांनी सभेला परवानगी नाकारल्याचे सांगितले, तेव्हा आमहाला नाही तर कुणालाच हे मैदान मिळणार नाही, पावसाचा अंदाज घेत सभागृहात सभा आयोजित केल्याचे सांगत निवडणुका नाही काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.

मी माझी भूमिका देशाला महाराष्ट्राला सांगणार, मी अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली, मात्र त्यासाठी विरोध होत गेला. या परिस्थितीचा पुर्ण आढावा मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून मिळत होती. आणि मला लक्षात आलं की हा सापळा आहे आणि यात आपल्याला फसवण्याच प्रयत्न सुरू आहे. हा सापळा महाराष्ट्रातून रचला गेला होता, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असे ठाकरे म्हणाले.

मी तिकडे गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांवर अनेक गुन्हे लावले असते. अयोध्येत काही झालं असतं तर, याचा विचार मी केला. माझ्या कार्यकर्त्यांना मी जेलमध्ये सडवणार नाही. मी वाट्टले ती टिका सहन करायला तयार आहे. पण ऐन निवडणुकीच्या काळात मी माझ्या कार्यकर्त्यांना गमावणार नाही, मी माझ्या सच्चा कार्यकर्त्यांना गमावणार नाही, असे म्हणत ठाकरे यांनी मनसे सैनिकांचे मन जिंकले.

राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लदाखमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे.खरं खोटं हिंदूत्व सांगायला काय ते वॉशिंग पावडर आहे, त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात,म्हणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT