Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर रायगड येथे अपघात, चालकाचा पाय तुटला; बस आणि ट्रकची धडक

Mumbai-Goa Highway ST Bus And Truck Accident: मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. कोलेटी गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय.

Sameer Amunekar

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. कोलेटी गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपगात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक पाय तुटला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या एसटीच्या धडकेतच ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चकणाचूर झाला. धडकेनंतर ट्रकचा भाग आतमध्ये फसला आणि चालकाचा पाय केबिनमध्ये अडकून बसला. यामुळे चालक एका जागी अडकून पडला होता.

अपघाताच्या काही क्षणांतच स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धावून आले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत एसटी बसला लोखंडी साखळदंडांच्या मदतीने मागे खेचले. यामुळे ट्रकचा अडकलेला भाग काहीसा मोकळा झाला आणि बचाव करणाऱ्या नागरिकांनी चालकाला बाहेर काढण्यात यश मिळवले.

यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील ट्रक चालकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

SCROLL FOR NEXT