Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

'Uddhav Thackeray 2024 च्या लोकसभेसाठी शिवसेनेचा चेहरा नाहीत', शेवाळेंच मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हे विजयी चेहरा नाहीत.

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Elections: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हे विजयी चेहरा नाहीत, त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाशी (BJP) युती करणे आवश्यक असल्याचे मत बंडखोर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी गुरुवारी व्यक्त केले. मंगळवारी लोकसभेत पक्षाचे नेते म्हणून नियुक्त झालेले शेवाळे म्हणाले की, 'शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी आम्ही आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत नेतृत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्यासमवेत अनेक बैठकांमध्ये उपस्थित केला होता.'

शेवाळे पुढे म्हणाले, “मी ठाकरे यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसाठी नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) देखील उपस्थित होते. निवडणुकीचा चेहरा म्हणून राऊत यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव पुढे केले होते. त्यावर मी त्यांना सांगितले की, आम्ही उध्दव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आदर करतो, परंतु आपण वास्तववादी असले पाहिजे. ते लोकसभा निवडणुकीचा चेहरा होऊ शकत नाही.'

शेवाळे पुढे म्हणाले की, शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. शेवाळे पुढे असेही म्हणाले की, 'संयुक्त पुरोगामी आघाडी ( UPA) राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, जी त्यांच्या कार्यकर्त्यांना मान्य होणार नाही.' शेवाळे आणि अन्य 11 लोकसभा सदस्यांनी आपली भूमिका बदलली. हे बारा लोकसभा खासदार बंडखोर शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

दुसरीकडे, शिवसेनेतील प्रचंड बंडखोरीमुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. 30 जून रोजी बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिवसेनेचे अनेक नेते भाजपसोबत युती करण्याच्या बाजूने असून पुढील लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन शेवाळे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

Budh Mangal Yog: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुध-मंगळाचा ‘दशांक योग’! 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; अफाट धनलाभासोबत सुरु होणार सुवर्णकाळ

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT