Zika Virus Dainik Gomantak
महाराष्ट्र

Zika Virus: महाराष्ट्रात सापडला झिका व्हायरसचा रुग्ण

Zika Virus: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत झिका व्हायरसचा हा तिसरा रुग्ण सापडला आहे.

दैनिक गोमन्तक

Zika Virus: महाराष्ट्रात पुन्हा एकदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. हा रुग्ण पुणे शहरात आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत झिका व्हायरसचा हा तिसरा रुग्ण सापडला आहे. त्यापैकी दोन रुग्ण पुण्यातील आढळल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

पुण्यात सापडलेला रुग्ण मूळचा नाशिकचा असून तो पुण्यात कामासाठी आला होता. त्यापूर्वी त्याने सूरत (Surat) येथे प्रवास केला होता.पुण्यात आल्यानंतर रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागल्यानंतर जहांगीर रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल झाला. उपचारादरम्यान ,झिका व्हायरसचे संक्रमण झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

दरम्यान,आरोग्य खात्याने भविष्यात झिका व्हायरसाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचवले आहे. येणाऱ्या काळात झिका व्हायरस (Zika Virus) पसरु नये म्हणून पुण्यात एंटोमोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 2016 मध्ये ब्राझीलमध्ये झिका व्हायरसचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले होते. तेव्हापासुन झिका व्हायरसला महत्वांच्या आजारांपैकी एक मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT