Milk producers in crisis: महाराष्ट्रातील अनेक भागात आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गुरांवर वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांचा विळखा बसताना दिसत आहे.
आधीच लम्पीमुळे (Lumpy) ग्रासलेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होताना दिसत आहे. यामुळे मात्र पशुपालक चिंतेत आहे.
राज्यभरात सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावारांध्ये "फूट अॅन्ड माऊथ डिसीज" अर्थात तोंडखुरी व पायखुरी असे विषाणूजन्य आजार बळावत आहे. यामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दूध उत्पादक संकटात आहे. आगामी काळात जर थंडीच प्रमाण वाढलं तर लम्पी आजाराचा फैलाव जास्त मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती ही पशुवैद्यक तज्ज्ञांना वाटत आहे.
सध्या गोव्यातील काही भागात लम्पी आजाराला जनावर बळी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. सत्तरी भागातील पशुपालक चिंतेत असून या भागातील जनावरांना लम्पी रोगाची लागण मोठ्या प्रमाणात व्हायला सुरवात झाली असून या रोगामुळे गुरे दगावण्याचे प्रकार होत असल्याने दूध उत्पादकांना अतोनात नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे सरकारने लंपी रोगाचा मुकाबला करताना युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी झाली.
तसेच, दगावल्या गेलेल्या गुरांप्रती दूध उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेने केली आहे. दूध उत्पादकांप्रती सरकारकडून अनास्थाच दर्शवल्यास शेवटी रस्त्यावर येण्याची पाळी दूध उत्पादकांवर येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.