Shivaji Maharaj Statue of Sindhudurg Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरुन विरोधक गलिच्छ राजकारण करतायेत का?

Manish Jadhav

महाराष्ट्रातील राजकारण सध्या चागंलचं तापलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणावरुन महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती यांच्यात चांगलीच जुंपलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात याप्रकरणी महाराष्ट्रातील जनतेची जाहीरपणे माफी मागितली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही याप्रकरणी माफी मागितली.

दरम्यान, पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या शिल्पकार आणि स्ट्रक्चरल ऑडिटरवर गुन्हे दाखल करण्यात आला असून, सरकारकडून चौकशी समितीही नेमण्यात आलीय. ज्यांच्या पुढाकाराने हा पुतळा उभारण्यात आला, त्या नौदलानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच संयुक्त बैठक घेऊन नौदल आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणा केलीय. शिवाय, त्याच किल्ल्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केलीय.

या घटनेनंतर सरकारकडून आवश्यक ती पावले उचलण्यात आलीत. पण विरोधकांनी या घटनेवरुन सत्ताधारी शिंदे सरकारला धारेवर धरलयं. या घटनेला विरोधक ज्या प्रकारे अतिशयोक्ती करुन राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक घडामोडींना जातीय रंग देत आहेत, ते महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. सरकारच्या कारभारावर विरोधकांनी टीकेची जी पातळी गाठली ती महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती, असे सर्वसामान्य जनतेला वाटते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी ठाकरे समर्थक आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये घमासान पाहायला मिळाले. तथापि, आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांसारख्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याची छायाचित्रे पोस्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर यापैकी एकाही नेत्याने या ठिकाणी भेट दिली नव्हती. मात्र पुतळा कोसळल्यानंतर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणाला भेट देण्याचा धडाका लावला.

शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जातींना एकत्र करुन मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक धोरणांमुळे आज महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, अनेकदा महाराजांचे नाव घेणाऱ्या विरोधकांनी द्वेष आणि जातीच्या राजकारणाची बीजे पेरली. 1948 मध्ये काँग्रेसने ही परंपरा सुरु केली आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही काँग्रेसच्या नेत्यांनी हा फुटीर वारसा जपल्याचा आरोप भाजपने केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT