Indian military Dainik Gomantak
महाराष्ट्र

Operation Varsha 21: महाराष्ट्राच्या मदतीला आले भारतीय लष्कर

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोनाचं (Covid 19) संकट असताना दुसरीकडे मागील काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्यांच्या पातळीमध्ये प्रंचड वाढ झाली आहे. त्यातच आता कोकणाधील (Konkan) नद्यांची पातळी वाढल्यामुळे रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि अन्य जिल्ह्यामधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. नागरी प्रशासनाच्या विनंतीनुसार सदर्न कमांडने (Southern Command) राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी पथके तैनात केली आहेत.

24 जुलै रोजी औंध लष्करी तळ आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपची एकूण 15 पथके सांगली, पलूस , बुर्ली आणि चिपळूण मध्ये बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली होती. ही मदत आणि बचाव कार्य पथके पूरग्रस्त भागामधील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पाण्याखाली गेलेल्या भागात फसलेल्या नागरिकांची सुटका करण्यात नागरी प्रशासनाला मदत करणार आहेत. पूरग्रस्त भागातून सध्या जवळपास 100 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले आहे.

दरम्यान, भारतीय लष्कर देखील पूरग्रस्त भागामधील नागरिकांना तयार खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी पुरवत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिबिरे देखील स्थापन केली आहेत. ज्यामध्ये पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी लष्करातील डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांची वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. जवानांनी दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे बुद्रुक गावामधील मुख्य मार्ग खुला केला आहे.

सध्याच्या पूरग्रस्त परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराने पुणे स्थित मुख्यालय सदर्न कमांड येथे मदत सहाय्यता मोहीम वॉर रूमची स्थापना केली आहे. त्याचबरोबर अतिरिक्त 10 मदत पथके आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT