pankaja munde Dainik Gomantak
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे – पंकजा मुंडे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात भोंगा आणि हनूमान चालिसा या मुद्यावरुन गेले चार ते पाच दिवस चांगलीच जुंपली असून या मुद्यांवरुन राज्यातील नेत्यांमध्ये आरोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. हे सुरु असतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. ( OBC will take the role of holding elections along with reservation - Pankaja Munde )

महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कारण, राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. यावरून आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकावर टीका करणे सुरू केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे देखील निशाणा साधला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणल्या “मी पूर्वीच असं भाष्य केलं होतं, ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते आता सत्यात उतरताना दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय या मागची भूमिका महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण गंभीरपणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरलो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासमोरचं प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेलं आहे.”तसेच आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार आहे का ? याकडे आता माझं लक्ष आहे.” असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT