OBC Reservation Devendra Fadnavis, Pankaja Munde Dainik Gomantak
महाराष्ट्र

OBC Reservation: घरी बायकोने मारले तरी ते मोदीच जबाबदार: फडणवीस

OBC Reservation घरी बायकोने मारले तरी ते त्यासाठी मोदींनाच (Narendra Modi) जबाबदार धरणार असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंत्रींडळातील नेत्यांवर लगावला.

दैनिक गोमन्तक

नागपूर: OBC Reservation राज्य सरकार (Maharashtra) आपल्या अपयशाचे खापर मोदींवर फोडते आहे. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांचे महत्त्व ताटातल्या चटणीएवढं आहे. घरी बायकोने मारले तरी ते त्यासाठी मोदींनाच (Narendra Modi) जबाबदार धरणार असा टोला त्यांनी मंत्रींडळातील नेत्यांवर लगावला. नागपुरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरजार टिकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून, पुण्यातील कात्रज बायपासजवळ पंकजा मुंडे यांनी ठिय्या मांडला आहे.

फडणवीस म्हणाले, सकरारच्या नाकर्तेपणानुळे आरक्षण गेलं, प्रत्येक राज्यात ओबीसी आरक्षण आहे तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षणाचा कायदा राज्य सरकारच्या हातात आहे केंद्र सरकारच्या नाही त्यामुळे राज्य सरकारने यावर विचार केला पाहिजे. छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची आज जयंती आहे त्यांना नमन करतो. शाहू महाराजांना सामाजिक न्याय काय असतो हे जगाला दाखवून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बीड, औरंगाबाद, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यात पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी पुण्यात भाजप आक्रमक झाले असून ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, सरकारने 15 महिने वेळकाढूपणा केला असा घणाघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. दरम्यान मुंबईत पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Goa Live News: ... आणि मांजरीने घेतला छत्रीचा आसरा!

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

SCROLL FOR NEXT