Udayanraje Bhosale Dainik Gomantak
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: 'नुपूर शर्माला जो न्याय, तोच कोश्यारींना का नाही'? उदयनराजेंचा केंद्र सरकारला सवाल

पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी काढलेल्या मोर्च्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी हा संतप्त सवाल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपाल कोश्यारींना का हटवले नाही, नुपूर शर्मांला एक राज्यापालांना तोच न्याय का नाही असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला चिचारला आहे. पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी काढलेल्या मोर्च्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी हा संतप्त सवाल केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने राज्यभर जनक्षोभ उमटताना दिसत आहे. राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आली असून, यापार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

शिवरायाबद्दल लोकांच्या मनात साडेतीनशे वर्षांनंतरही प्रेम कायम आहे. त्यांच्या सन्मान व्हावा हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली हीच खरी शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. पक्ष ही दुय्यम गोष्ट आहे, राज्यपाल यांच्याबद्दल तातडीने भूमिका घ्यायला हवी अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपालांना का हटवले नाही, राज्यापालांना तोच न्याय का नाही असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT