Raju Shetty Dainik Gomantak
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढणं योग्य नाही; राजू शेट्टी

विमा कंपन्यांनी (Insurance company) शेतकऱ्यांसह (farmers) राज्य आणि केंद्राची तिजोरी लुटली असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे.

दैनिक गोमन्तक

एसटी कर्मचारी (ST) करत असलेला संप योग्यच असून एसटी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी राज्य सरकारकडून संप मोडून काढण्याची भाषा केली जात आहे. आणि हे योग्य नाही.

सध्या भाजप (BJP) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आहे. मात्र त्यांच्या काळात देखील त्यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला होता असा टोलाही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी भाजपला लगावला.

जालन्यात माध्यमांशी बोलत असताना राजू शेट्टी म्हणाले, अतिवृष्टीच अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे. असेही ते म्हणाले.

केवळ घोषणा करायच्या आणि पीकविमा कंपन्यांना (Crop insurance) मोकाट सोडायचे असे काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसह राज्य आणि केंद्राची तिजोरी लुटली असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे. पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून प्रशासनातील (administration) काही लोकांचा सहभाग असल्याचं देखील शेट्टी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

US Open Final 2026: एलेना रिबाकिना बनली नवी 'चॅम्पियन'! जागतिक नंबर 1 सबालेंकाचा पराभव करत जिंकला पहिला यूएस ओपन ताज; स्टेफी ग्राफचा मोडला रेकॉर्ड

Porvorim Road Accident: उन्नत मार्ग खुला होताच पहिला भीषण अपघात; पर्वरीत दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर! लेन बदलण्याच्या धोक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Strait Of Hormuz: अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' रोखण्यावरुन इराणची वॉशिंग्टनला खुली चेतावनी; पेझेश्कियान यांनी सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT