Nitesh Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

'या' कारणामुळे मी गोवा दौऱ्यावर जाऊ शकलो नाही!

महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार मला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे यांचा संबंध असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याच पाश्वभूमीवर संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. 30 हजार रुपयाच्या जातमुचलक्यासह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याच पाश्वभूमीवर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार मला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. (Nitesh Rane Has Said That He Could Not Go To Goa Due To Health Problems)

दरम्यान ते पुढे म्हणाले, 'आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. भाजपने माझ्यावर मुंबई महानगरपालिकेसह गोव्याची जबाबदारी सोपवली आहे. परंतु सततच्या आरोग्य समस्येमुळे मी गोव्याला देखील जाऊ शकलो नाही.'

शिवाय, जिल्हा सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. राणे यांनी 4 फेब्रुवारी नियमित जामीनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यावरील सुनवाणी 8 तारेखला झाली होती. त्यावर अखेर न्यायालयाने निर्णय देत राणे यांचा जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT