NCB officer Sammer Wankhede writes letter to Mumbai Police commissioner  Twitter @ANI
महाराष्ट्र

पंचाच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं पोलीस महासंचालकांना पत्र, म्हणतात....

दैनिक गोमन्तक

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या मुंबई क्रूझ (Mumbai Cruse Case) प्रकरणावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजप या तीन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आर्यन खानच्या बाजूने महाविकास आघाडी उभी आहे तर दुसरीकडे एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या बाजूने भाजप दिसत आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. याच प्रकरणाशी संभांदित आणखीन एल मोठा खुलासा समोर आला आहे. फरार साक्षीदार के.पी.गोसावी यांचे सहाय्यक प्रभाकर साईल (Prabhakr Sail) यांनी समीर वानखेडेवर गंभीर आरोप केले आहेत. (NCB officer Sammer Wankhede writes letter to Mumbai Police commissioner)

मुंबई क्रूझ धाडी प्रकरणी एनसीबीने आपल्याला खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावल्याचा खळबळजनक आरोप प्रभाकर साईल याने केला आहे.त्याला 10 कोऱ्या कागदांवर सही करायला लावण्यात आली. विशेष म्हणजे हा छापा टाकताना तो समोर नसताना देखील त्याला एनसीबीच्या छाप्याचा साक्षीदार बनवण्यात आलं आहे . त्याच वेळी, त्याने गोसावी आणि सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचे फोनवरील संभाषण ऐकल्याचा आरोपही केला आहे . या कॉलवर गोसावी म्हणत होते '25 कोटींचा बॉम्ब ठेवा.'18 कोटींचा सौदा फिक्स करू. यातील 8 कोटी समीर वानखेडे यांना द्यावे लागणार आहेत. म्हणजेच आर्यन खानचे प्रकरण दडपण्यासाठी ही डील केली जात होती. मात्र नंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी त्याचा फोन उचलणे बंद केले.

या आरोपाला प्रतिउत्तर देताना समीर वानखेडे यांनी प्रभाकरचा हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. या संदर्भात समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे.

या पत्रात समीर वानखेडे यांनी लिहिलं आहे की, “मला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये. हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे. मला तुरुंगात पाठवले जाईल आणि कामावरून काढून टाकू , अशा धमक्या काही लोकांकडून दिल्या जात आहेत. हे प्रकरण डीडीजी आणि एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. म्हणूनच पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये. " अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

यापूर्वीही आपली हेरगिरी केली जात असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला होता .यासाठी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता . खुद्द समीर वानखेडे यांनी याबाबत डीजीपी संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. पण रविवारी मुंबई पोलिसांकडून असे सांगण्यात आले की समीर वानखेडे यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. सध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील गूढ उकलण्याऐवजी ते त्यात अडकत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Today's News Live: डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग लावल्याप्रकरणी एकास अटक

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

एक देश, एक निवडणूक! पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ऐतिहासिक म्हणत केले निर्णयाचे स्वागत

Goa Monsoon: अति पावसामुळे सांगेत सुपारी उत्पादकांना फटका! अजूनही गळती सुरुच; शेतकऱ्यांत चिंता

SCROLL FOR NEXT