National Navy Day 2023 At Sindhudurg Fort 
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस, राजकोट किनाऱ्यावर साकारणार शिवरायांचा पुतळा

कार्यक्रमांसाठी आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी चव्हाण यांनी दिल्या.

Pramod Yadav

National Navy Day 2023 At Sindhudurg Fort: भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने भारतीय नौदलाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या संदर्भात पूर्वतयारीबाबत मंत्रालयात आज (मंगळवार, दि.26) मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमांसाठी आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी चव्हाण यांनी दिल्या.

यंदाचा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्य दिव्य स्वरुपात झाला पाहिजे. यासाठी सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश चव्हाण यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले.

राजकोट किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणाऱ्या नौदल दिवसाचे औचित्य साधून नौदलाच्या वतीने मालवणजवळच्या राजकोट किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भात अधिकार्‍यांनी सादरीकरण करत प्रकल्प आणि पुतळ्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

Viral Video: 'एक चूक आणि खेळ खल्लास...' धावत्या लोकलच्या दारात तरुणीचा धोकादायक डान्स; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

SCROLL FOR NEXT