Bharat Jodo Yatra Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत आज नारी शक्तीचं दर्शन

Indira Gandhi Jayanti: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसने भारत जोडो यात्रेच्या पहिल्या रांगेत फक्त महिलांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) नारी शक्तींच दर्शन पाहायला मिळणार आहे. यामध्ये कॉंग्रेसच्या महिला खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसने महिलांच्या सन्मानासाठी मोठे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज शेगावातील गजाननदादा मार्केट यार्डपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर यात्रा विश्रांतीसाठी सकाळी 10 वाजता जलंब या ठिकाणी थांबली होती. विश्रांतीनंतर दुपारी चार वाजता पुन्हा पदयात्रेस सुरुवात होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी भस्तानमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) कॉर्नर सभा घेणार आहेत. ही सभा संपल्यानंतर भेंडवळमध्ये यात्रेचा मुक्काम असणार आहे.

इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त आज भारत जोडो यात्रेच्या पहिल्या रांगेत कॉंग्रेसच्या महिला खासदार, आमदार, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि महिला पदयात्री राहुल गांधी यांच्यासह पहिल्या रांगेत चालणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तरुणांसह महिलांचा (Women) मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आजच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT